मुजोर आमदाराची मस्ती उरतविणार-आगरी, कोळी, कराडी समाजाचा निर्धार

 मुजोर आमदाराची मस्ती उरतविणार-आगरी, कोळी, कराडी समाजाचा निर्धार


उरण : आगरी, कोळी, कराडी आदिवासी समाजबद्दल अवमानजनक भाषा वापरणाऱ्या आ.महेश बालदी याना सत्तेची मस्ती चढली असून या निवडणुकीत हा स्थानिक समाज या उद्दाम आमदाराची घमेंड उतरवून मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा शिवकरचे माजी सरपंच अनिल ढवळे यानी दिला.
     उरण विधानसभा सार्वञिक निवडणुकीच्या निमीत्ताने शेकाप नेते प्रितमदादा म्हाञे यांची पलस्पे रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पळस्पे ग्रामस्थासमोर ते बोलत होते. सभेसाठी सचीन ताडफळे महेश साळुंखे, शिवाजी काळे, मोहन गवंडी, विलास गवंडी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल ढवळे म्हणाले की उरण तालुका ही लढवय्याची भुमी आहे. शेतकर्यानी येथे आपले रक्त सांडून आंदोलने यशस्वी केली आहे. त्याच्या बलिदानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या हुतात्म्याच्या भुमीतून हा मस्तवाल आमदार आगरी कोळी, आदिवासी समाजाविरूद्ध अपशब्द उच्चारतो ते येथील लढावू समाज कधीच खपवून घेणार नाही. या निवडणुकीत हाच आगरी, कोळी आदिवासी या आमदाराची मस्ती कायमची जिरवल्याशिवाय राहणार नाही.
        या सभेत बोलताना सचीन ताडफळे यानी या थापेबाज आमदाराचे कपडेच फाडले. ते म्हणाले याने पाच वर्षात एक काम केले नाही. पण तरी राज्यातील मोठमोठे प्रकल्प आपणच आणल्याचे तो सांगत आहे. अरे बादली तुझी औकात काय तु बोलतो किती असे सुनावले. या सभेत प्रितमदादा म्हाञे यानी या खोटारड्या आमदाराच्या भुलथापाना बळी न पडता यावेळी तुमच्यातील कार्यसम्राट युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन केले. 

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image