उरणमध्ये प्रितम म्हात्रेंच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 उरणमध्ये प्रितम म्हात्रेंच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


उरण : उरण येथे शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या मोटरसायकल रॅलीला उरण शहर व परीसरातील गावातून तरूणानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
    उरणच्या कोट नाक्यावरून निघालेल्या रॅलीत तरुण युवक शहरातील व्यापारी उद्योजक, कामगार ममोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 15 नोव्हेंबर रोजी महागणपती चिरनेर येथे बाप्पांचे दर्शन घेऊन प्रीतम म्हात्रे यांची मोटरसायकल रॅली पुढे भोम, कळंबूसरे, मोठी जुई, कोप्रोली, पानदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कोप्रोली, खोपटा, उरण शहर येथे नेण्यात झाली. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येऊन येऊन येणार कोण, प्रीतम दादा शिवाय आहेच कोण, उरणचे आमदार प्रीतम दादा होणार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तरुणाई या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.  यावेळी जेएन पी टी कामगार नेते रवि घरत, प्रवक्ते रमाकांत म्हाञे, निधी ठाकूर आदीच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या रॅलीत अनेक जण सहभागी झाले होते. 


 

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image