नागरी समस्याकडे दुर्लक्ष करून विकासाच्या नावाखाली थापा मारणाऱ्या महेश बालदीला हद्दपार करा- विनोद साबळे
उरण : करंजाडे शहराला वीज, पाणी, रस्ते, पुल, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत असून समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेले आ. बालदी समस्या सोडविण्यासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी काहीही न करता करंजाडेमध्ये आपण हजारो कोटीची विकास कामे केल्याचे खोट्या बाता मारत आहेत. अशा विकासाच्या खोट्या वल्गना करणाऱ्या भंपक आमदाराला करंजाडेकरानी हद्दपार करून विकासाची दृष्टी असलेल्या प्रितमदादा म्हाञे याना विजयी करावे असे आवाहन मराठा महासंघाचे समन्वयक विनोद साबळे यानी केले.
उरण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार प्रितमदादा म्हाञे याच्या प्रचारानिमीत्त करंजाडे येथे भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी नारायण शेठ घरत, रा.काग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व्ही.बी. म्हाञे, उरण उत्कर्ष सभेचे गोपाळ पाटील, का.भुषण पाटील, रा काँग्रेसचे उत्तम गायकवाड, सचीन ताडफले, महेश साळुंखे, रवि घरत, मोनिका चोरघे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षात बालदी करंजाड्यात फिरकलेही नाही. येथील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत असताना येथील नागरीकाना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, मी व येथील रहिवासी त्याना भेटलो. पण त्यानी आमच्या समस्या सोडवणे तर दूरच साधी दखलही घेतली नाही. येथे रस्त्याची इतकी दूरवस्था झाली असताना त्याकडे लक्ष दिले नाही. माञ निवडणुक लागताच करंजाडे मध्ये 6 हजार कोटीचा स्काय वॉक उभारल्याचे सांगत आहे. आपल्या पुस्तिकेतही याचा उल्लेख केला आहे. माञ करंजाडेत हा स्काय वॉक कुठे शोधूनही सापडत नाही. कुठे साधी गार्डन नाही की स्वच्छतागृह नाही, प्रचंड अस्वच्छता असे बकाल स्वरूप झाले आहे. वडील करंजाडेचे 25 वर्ष, मी, रामेश्वर करंजाड्याचे सरपंच होतो तेव्हा येथे मुबलक पाणी मिळत होते पण आज पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय, तो केवळ याच्या नाकर्तेपणामुलेच. या शहराचा विकास घडवून आणण्याची ताकद फक्त प्रितम म्हाञे यांच्यातच आहे. त्यामुळे या बिनकामी थापेबाज बालदीला येथून हद्दपार करा असे आवाहन त्यानी केले.
यावेळी बोलताना गोपाळ पाटील म्हणाले की एक जुगारी अन दुसरा दलाल टक्लेवारी घेणारा समाजासाठी याचे योगदान शून्य आहे. यानी निवडून आल्यापासून नव्या पैशाचे काम केले नाही. माञ आपण न केलेल्या कामाचे श्रेय लाटायला सर्वाच्या पुढे हजर असतो. कणा नसलेला लाचार मनोहर भोईर याच्या मुलीचे एडमिशन आपण केले असल्याचे बालदी सांगतात. माञ मनोहर भोईर यानी पलटवार करताना बालदीनी माझ्या मुलीचे एडमिशन केले हे खरे आहे पण त्यासाठी त्यानी पैसे घेतले असल्याचे सांगून त्याची लायकी दाखवून दिली. करंजाडे शहराचा विकास केवळ आपला माणूस प्रितम जे एम म्हाञेच करू शकतो असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
यावेळी बोलताना काम्रेड भुषण पाटील म्हणाले की, आंतरराष्टीय विमानतळ व जेएनपीटी बंदरामुळे केंद्रातून त्याला अनुषंगून येथे रस्ते, पुल, अटल सेतू असे मोठे मोठे प्रकल्प राबवले. त्या विकासात येथील स्थानिक आमदाराचे काडीचेही योगदान नाही. माञ हा या वांझोट्या विकासाचे श्रेय घेवून लोकांची दिशाभुल करीत आहे. आमदाराचे काम स्थानिक विकासाचे असते. याने कुठे असा विकास केला नाही केवल दलाली करण्याचे काम केले. आज महागाई अस्मानाला भिडली आहे. लोकाना जगणे कठीण झाले आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. हे दुष्टचक्र रोखायचे असेल तर जनतेच्या समस्याची जाणीव असलेल्या प्रितम जे एम म्हाञे याना विजयी करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यानी केले. यावेळी प्रितम जे एम म्हाञे यानी करंजाडयांच्या समस्या एक वर्षाच्या आत सोडवून विकास साधला जाईल असा विश्वास व्यक्त केला.