बाळाराम पाटील याना मदत करता यावी म्हणून शिवसेना ( ठाकरे ) तालुका प्रमुख पदाचा राजीनामा

 बाळाराम पाटील याना मदत करता यावी म्हणून शिवसेना ( ठाकरे ) तालुका प्रमुख पदाचा राजीनामा 


माझ्या बांधवांना मदतीचा वेळोवेळी मदत केली त्याची परतफेड करायची आहे 


पनवेल : शेतकरी कामगार पक्षानी पनवेल मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल अर्बन बँक मधील सत्तेत शिवसेनेला सहभागी करुन घेतले आहे. तसेच महाविकास आघाडीचे आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेगळी प्रकारची जनआंदोलने उभी करून न्याय मिलवून दिला आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील याना निवडून आणण्यासाठी तन मन धन लावून काम केले. त्यात पनवेल तालुक्यात शेकापचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या बांधवांना शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांची वेळोवेळी मदत मिळत आली आहे.  त्याची परतफेड करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून मी बाळाराम पाटील यांचा प्रचार करणार आहे. तेव्हा मी श्री विश्वास जगन्नाथ पेटकर माझ्या तालुका पदाचा राजीनामा देत आहे असा आशयाचे पत्र विश्वास पेटेकर यानी शिवसेना पक्षप्रमुख  श्री उद्ध‌व ठाकरे (मा. मुख्यमंत्री) यांच्याकडे सादर केले आहे.

      शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी २००७ साला पासून विभागप्रमुख पदाची जबाबदारी देऊन शिरवली विभागात शिवसेनेचे भगवे वादळ टिकवुन ठेवले, त्यातच शिवसेनेचा गावाला सरपंच, उपसरपंच पदावर निवडून आल्यानंतर जनसेवेला वाहून घेतले आहे. संघटना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करून शिवसेना ही मोठी ताकद उभी केली. त्यात पनवेल महानगर पालिकेची निवडणूक लढवुन शिवसेनेची ताकद विरोधकाना दाखवुन दिली. शिवसेना विभागप्रमुख विश्वास पेटकर यानी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांची दोन वर्षापूर्वी पनवेल तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. आणि ते तालुका प्रमुखची जबाबदारी इनामेइतबारे सांभाळत आले आहेत. पण माझ्या बांधवांना विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील याना मदत करायची आहे. आता महाविकास आघाडीचे दोन उमेदवार उभे आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनात प्रचार कोणाचा करायचा हा संभ्रम निर्माण असून मतदारांची काय अवस्था असेल हे सांगायलाच नको !
     शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेला वेळोवेळी केलेली मदत पाहता एक खारीचा वाटा उचलताना विश्वास पेटकर महाविकास आघडीचे आमदार बाळाराम पाटील याचा प्रचार करणार आहे. त्यामुळे विश्वास जगन्नाथ पेटकर यानी आपला तालुका पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. त्याच बरोबर महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image