उरण तालुक्यात प्रचार रॅल्यानी वातावरण तापले, प्रितमदादाच्या पाठीशी तरूणाई एकवटली

 उरण तालुक्यात प्रचार रॅल्यानी वातावरण तापले, प्रितमदादाच्या पाठीशी तरूणाई एकवटली


उरण : निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली असून तरूणाई अंगात वारे संचारल्याप्रमाणे शेकापचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम जे एम म्हाञे यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीनिशी एकवटली आहे.
      विद्यमान आमदारानी गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या प्रश्नाकडे लक्ष न देता आमदारकीचा  वापर केवळ स्वत:ची तिजोरी भरण्यासाठीच केल्याने तालुक्यातील जनता त्यावर पूर्ण नाराज आहे. अशा बिनकामी आमदाराला घरी बसवून तालुक्याचा विकास साधण्यासाठी अवघी तरूणाई त्यांच्यामागे एकवटली आहे. उरण विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम जे एम म्हाञे यांनी प्रचार रॅलीच्या निमीत्ताने पागोटे, वेश्वी, दादरपाडा, फुंडे, बोकडविरा, करंजा, न्हावाशेवा गावाचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात प्रितमदादा साठी स्वत:ला प्रचाराच्या कामात झोकून दिलेल्या तरूणाईमुळे प्रचारात वेगळीच रंगत आणली असून शेकापची हवा निर्माण झाली आहे. प्रितमदादानी या भागात घेतलेल्या आघाडीमुळे सर्वञ जल्लोशपूर्ण वातावरण तयार झाले आहे. कॉर्नर सभांनी तालुक्याचा विकास आणि बेरोजगारीवर प्रकाश टाकत विद्यमान आमदाराच्या अपयशावर अचूक बोट ठेवले आहे. त्यामुळे संपूर्ण तरूणाई प्रितम म्हाञे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

आकुलवाडी गावातील भाजप पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते निलेश जाधव, कैलास मोरे, सागर रामगुडे, विशाल मोरे, दीपक मांडवकर, यांनी शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपला आकुलवाडी मध्ये खिंडार पडले आहे. (फोटो)

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image