पनवेल विधानसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या घरोघरी प्रचाराला वेग, नागरिकांचा चांगला प्रतिसाद

 पनवेल विधानसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या घरोघरी प्रचाराला वेग, नागरिकांचा चांगला प्रतिसाद


पनवेल : पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला असून, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जावून शिट्टी हे चिन्ह पोहचवित असून शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून बाळाराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन करण्यात येत आहे. गावोगावी आणि शहरात बाळाराम पाटील यांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
     पनवेल शहर, तालुका, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर,तळोजा आदी भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे बाळाराम पाटील यांना विजयी करण्यासाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. घरोघरी जावून प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, अशा स्वरुपाच्या पत्रकांचे वाटप सुरू आहे. या प्रचारात तरुण वर्ग सुद्धा मोठा हिरीहिरीने भाग घेत असून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर बैठका, विविध समाज संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीमार्फत यापूर्वी झालेली विकासाची कामे तसेच सत्तेत आल्यावर पनवेलच्या विकासासाठी करण्यात येणारी कामे याची माहिती देण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आता चांगलेच प्रचारात एकरुप होवून उतरले असून शिट्टीचा आवाज प्रत्येक शहरात, गल्लीत, विभागात घुमू लागला आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे विरोधकांना चांगलीच धडकी बसली आहे.
            महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांची जाहीर सभा 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सेक्टर 36 कामोठे प्लॉट नंबर 45- 46 च्या बाजूला आयोजित करण्यात आली आहे . या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image