पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी;साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता

पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी;साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता 




कार्यकर्त्यांच्या 
डोळयांच्या पाणवल्या कडा 

 उरण : अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर  शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने स्वीकारत आपण जिगरबाज आहोत हे दाखवून देत कार्यक्रमास उपस्थित राहिले कार्यक्रमाच्या ठिकाणी गाडीमधून प्रितम म्हात्रे खाली उतरताच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घालून आपल्या जिगरबाज नेत्याला अभिवादन केले. चेहऱयावर पराभवाचे सावट सुद्धा नव्हते. स्मितहास्य चेहरा पाहून कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 24 तास सुद्धा झाले नसताना प्रितम म्हात्रे यांनी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजायला सुरवात केली आहे. याची गोळा बेरीज त्यांना आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कामाला येणार आहेत. नेता हा जनसामान्य जनतेला आपला वाटणारा असावा याचे आज जमलेल्या जनतेने अनुभवले कार्यक्रमाच्या ठीकाणी असणारया जेवणासाठी प्रितम म्हात्रे पंगतीमध्ये जाऊन बसले. त्यांची ही कृती पाहून युवकांनी त्याचे फोटो काढून आपले स्टेटस ला ठेवले आहेत. त्यांचा हा साधेपणा पाहून महिला वर्गामध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा चांगलीच रंगली.  झालेला पराभव स्वीकारत मतदारसंघात पुन्हा भेटीगाठी  सुरू केलेले प्रितम म्हात्रे खऱ्या अर्थाने जननायक ठरले. उरण मतदारसंघात त्यांनी दोन नंबरची 88,878 मते मिळवत महाविकास आघाडीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. लोकसभेत केलेल्या कामाच्या बद्दल मोठेपणा दाखवत जर शिवसेनेने शेकापला उमेदवारी दिली असती तर आज 50,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने प्रितम म्हात्रे विजयी झाले असते अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image