ओरॉयन मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणाईसाठी पर्वणीच आहे ः अभिनेत्री तन्वी मुंडले
पनवेल, दि.18 (संजय कदम) ः ओरॉयन मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणाईसाठी पर्वणीच आहे. पनवेलमध्ये असा अत्याधुनिक व सुसज्ज मॉल असणे हे अभिमानास्पद आहे. मंगेश परुळेकर, मनन परुळेकर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी चोखंदळ ग्राहकांना काय लागते याची पूर्ण जाणीव ठेवून येथून वेगवेगळ्या प्रकारचे व ब्रॅण्डचे दालने खुली केली आहेत व येथे खरेदी करताना एक वेगळाच आनंद मिळतो. व त्याचबरोबर ग्राहकांसाठी शॉप अॅण्ड विन ही स्पर्धा दरवर्षी सातत्याने आयोजित करतात व मोठ्या प्रमाणात बक्षिसे वाटप करतात ही एक पर्वणीच असल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी ओरॉयन मॉल येथे बक्षिस वितरणाप्रसंगी केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी काढण्यात आलेल्या लक्की ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस जावा याजदी रोड स्टार मोटार सायकल कुपल पाटील यांना मिळाली आहे. तर द्वितीय पारितोषिक ई बाईक मिली अँथनी तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपयाचे व्हॉऊचर भावना वरद यांना मिळाले आहे. यावेळी बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते पुष्प्कर जोग यांनी सुद्धा मॉलचे कौतुक करून प्रथमच अशा प्रकारचा मॉल व त्यात पनवेलकरांनी भरभरुन दिलेले प्रेम पाहिल्याने मन भरुन आले आहे. या ठिकाणी माझ्या मुलीसाठी खरेदी करण्यासाठी नक्कीच यायला आवडेल असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. अशाच प्रकारची स्पर्धा भरविण्याबद्दल परुळेकर कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.