महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थेचा पाठिंबा

 महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थेचा पाठिंबा 

पनवेल (प्रतिनिधी) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५२३, सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल आणि शिवाजी नगर युवक मित्र मंडळ पनवेल या संस्थांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे नुकताच सुपूर्द केले.  
पनवेल नगरीचा विकासात कायापालट करणारे पनवेलचे यशस्वी शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर हे बौद्ध समाजाला सन्मानाने वागणूक देतात तसेच तळागाळातील कार्यकर्त्याला महत्वाची जबाबदारी देत असतात. त्यामुळे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५२३, सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल आणि शिवाजी नगर युवक मित्र मंडळ आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image