उरण विधानसभा मतदार संघात आघाडी कडून काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत

उरण विधानसभा मतदार संघात आघाडी कडून काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत



उरण दि ५(प्रतिनिधी)दि. ०३ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल तर्फे "विधानसभा निवडणूक २०२४ आढावा बैठक" चे आयोजन प्रदेश मुख्यालय टिळक भवन, मुंबई येथे संपन्न झाले. अध्यक्ष स्थानी  काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी भाई देसाई होते. बैठकीचे आयोजन  प्रदेश अध्यक्ष विलासजी औताडे यांनी केले. या आढावा बैठकीसाठी राज्यातील बहुतांशी सेवादल जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील विधानसभा निहाय परिस्तिथी व कार्यकारिणीचा आढावा दिला.राष्ट्रीय अध्यक्ष लालजी भाई देसाई यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.सदर आढावा बैठकीत रायगड जिल्हा सेवादल चे अध्यक्ष कमलाकर घरत व कार्याध्यक्ष वैभव ठाकूर यांनी रायगड जिल्हा विशेष पणे उरण विधानसभा संघाचा आढावा योग्यप्रकारे मांडून हा मतदार संघ आघाडी तर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत यांनाच देण्यात यावी यासाठी आग्रह करण्यात आला. महेंद्र शेठ यांचं दातृत्व, औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरी,  सिडको प्रशासनवरील पकड,प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबरदस्त कार्यशैली व बेधडक नेतृत्व यामुळे काँग्रेस पक्षाला रायगड जिल्यात नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पक्षाप्रति दाखवलेली निष्ठा, पक्षासाठी केलेला त्याग याची दखल घेऊन कार्यकारिणीने त्यांना उमेदवारी जाहीर करावी. उरण काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका आढावा बैठकचा अहवालचा दाखला देऊन उरण मधे काँग्रेस पक्षाची सकारात्मक आघाडी निदर्शनास आणून दिली.उरणची जनता आजी माजी आमदारांना कंटाळलेली आहे. महेंद्र शेठ यांचं कार्य, दानशूर पणा, दांडगा जनसंपर्क, त्यांच्या साठी तन मन धनाने झटणारे त्यांचे असंख्य कार्यकर्ते, उरण तालुका अध्यक्ष  विनोद म्हात्रे यांनी मेहनत घेऊन तालुक्यात काँग्रेस साठी तयार केलेलं सकारात्मक वातावरण या सर्वांची एक त्सुनामी होऊन त्यासमोर अन्य कोणी टिकूच शकणार नाही अशी ग्वाही उरण सेवादलच्या युनिटने दिली. या युनिट तर्फे केलेली मागणी नक्कीच मान्य होऊन लवकरच आघाडी तर्फे महेंद्रशेठ घरत यांनाच उरण विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास व्यक्त केला गेला. या आढावा बैठकीसाठी सेवादल रायगड जिल्हाध्यक्ष  कमलाकर घरत, कार्याध्यक्ष  वैभव ठाकूर, उरण शहर सरचिटणीस अकबर नदाफ तसेच जासई विभाग अध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image