पुणे येथे शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

पुणे येथे शरदचंद्रजी पवार  यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न





पुणे, दि ३(विठ्ठल ममताबादे )
 निसर्ग कार्यालय पुणे येथे शरदचंद्रजी पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेडकरवादी नेते तथा कोरेगाव भीमा चौकशी आयोगातील वकील ॲड.राहुलजी मखरे (माजी राष्ट्रीय महासचिव बी.एम.पी) यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो प्रशिक्षित कार्यकर्त्यांसह जाहीररीत्या पक्ष प्रवेश केला. 

आंबेडकरवादी नेते ॲड.राहुलजी मखरे गेल्या ३५ वर्षापासून शिव फुले शाहू आंबेडकर विचार बहुजन समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत तसेच सक्रिय समाजकारणासोबत सक्रिय राजकारणामध्ये देखील राष्ट्रीय स्तरावरती बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव पदावरती देशभरामध्ये बहुजनांचे राजकारण यशस्वी करण्यासाठी संघर्ष करत होते. 

ॲड.राहुलजी मखरे यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) यांना आगामी विधानसभा, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होणार आहे.

ॲड.राहुलजी मखरे यांच्या नेतृत्वामध्ये व मा.संतोषभाई घरत (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी), मा. बाळासाहेब मिसाळ पाटील (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी) यांच्या मार्गदर्शनामध्ये बाबजी नाना भोंग, महावीर वजाळे (माजी प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी युवा मोर्चा), मा.राजकुमार धोत्रे (अध्यक्ष अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र), गौरव पनोरेकर (युवा नेते), ॲड. सुनील आवारे (माजी प्रभारी बसपा-मुंबई प्रदेश), मा.वसीमभाई सय्यद (सामाजिक कार्यकर्ते), वैशाली राक्षे (महिला नेत्या), स्वराज सोनवणे (बिझनेस मॅनेजमेंट लंडन युनिव्हर्सिटी), राज पाटील ( नवी मुंबई) यांच्यासह हजारो युवा कार्यकर्त्यांनी महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी) मध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी  पंढरीनाथ पाटील ( रायगड जिल्हा उपाध्यक्ष, NCP(SP) व करण भोईर ( रायगड जिल्हा सरचिटणीस , NCP(SP) हे देखील उपस्थित होते.

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image