मौजे साठरे बांबर बौद्ध विकास मंडळ मुंबई,तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

मौजे साठरे बांबर बौद्ध विकास मंडळ मुंबई,तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा



मुंबई (प्रतिनिधी)- मौजे साठरे बांबर बौद्ध विकास मंडळ मुंबई,तालुका जिल्हा रत्नागिरी या मंडळाच्या विद्यामाने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन दिनांक २०/१०/२०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह भोईवाडा परेल येथे अध्यक्ष आदरणीय प्रविण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती चे कार्याध्यक्ष आदरणीय लक्षुमन भगत साहेब व बौद्धजन पंचायत समिती चिटणीस व पनवेल विभाग गट ५७ चे प्रतिनिधी आदरणीय प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

       या कार्यक्रमात गुणवत विध्यार्त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सेवा निवृत्त सभासद चारुशीला सावंत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भगत साहेब यांनी मंडळ कसे असावे व मंडळाचे काम कसे असावे तर साठरे बांबर या मंडळा सारखे असावे.मंडळाचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे अध्यक्ष प्रविण सावंत यांच्या नेतृत्वात चालू आहे असे सांगितले व प्रमोद सावंत यांनी सुद्धा मार्गदर्शन केल.तसेच मंडळाचे सल्लागार आदरणीय गोपीनाथ सावंत,भाऊ सावंत,शिवराम सावंत, धर्मदास सावंत व महिला सभासद सुरेखा जयवंत सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.मंडळाचे चिटणीस रमेश सावंत व सल्लागार प्रदीप सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर मंडळाचे खजिनदार विकास सावंत यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घेतली.या वेळी ग्रामिण मंडळाचे चंद्रमनी सावंत आवर्जून उपस्तित होते.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image