कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने ट्रान्सइंडिया कंपनीतील कामगारांना ८१०० रुपयांची पगारवाढ

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने ट्रान्सइंडिया कंपनीतील कामगारांना ८१०० रुपयांची पगारवाढ



उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला  न्यु ट्रान्सइंडिया प्रा. लि., खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांच्या पगारवाढीचा करार आज कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी मध्यस्थिने करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ८१०० रुपये पगारवाढ, एक ग्रॉस सॅलरी बोनस म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच ३ लाख रुपयांची कामगारांच्या परीवारासाठी मेडिक्लेम पॉलीसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.या करारनाम्याप्रसंगी  न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष  पि. के. रामण, सरचिटणीस  वैभव पाटील, उपाध्यक्ष विनोद म्हात्रे, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर  अजिंक्य हातीस्कर,कामगार प्रतिनिधी अलंकार पाटील, मनिष म्हात्रे, राजाराम पाटील, उत्कर्ष ठाकूर, राजेश पाटील, नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे, सुरज म्हात्रे, मयूर घरत, प्रथमेश म्हात्रे, राकेश पाटील, अक्षय ठाकूर, भूषण पाटील, ज्ञानदेव पाटील, सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर आदी उपस्थित होते.या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगारांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image