पत्रकार मित्र असोसिएशनच्या आरती संग्रहाचे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन

पत्रकार मित्र असोसिएशनच्या आरती संग्रहाचे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन



पनवेल / प्रतिनिधी
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव लक्षात घेता पत्रकार मित्र असोसिएशनने विविध देवी देवतांच्या ३२ आरत्या एकत्र असलेला आरती संग्रह संपादित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना एकाच पुस्तकात सर्व आरत्या सापडतील या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश महासिचव तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले.
सामाजिक, सांस्कृतीक कार्यात पत्रकार मित्र असोसिएशन नेहमीच अग्रेसर असते असे म्हणत त्यांनी असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण
असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे आधारस्तंभ दिपक महाडीक, संस्थापक केवल महाडीक, उपाध्यक्ष सुनील भोइर, कार्याध्यक्ष नितीन जोशी, दैनिक युवक आधारचे संतोष आमले उपस्थित होते. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनीही या आरतीसंग्रहाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image