करंजाडेतील दहीहंडीमध्ये कळंबोलीतील जंक्शन गोविंदा पथकाचा महिला अत्याचार जनजागृती फलक सलामी आकर्षण ठरला;माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांची प्रमुख उपास्तिथी
करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ करंजाडे मंडळाचे आयोजन
पनवेल/प्रतिनिधी :-- महिला अत्याचारांच्या घटनेनं देश हादरला आहे, मग ते बदलापूरमधलं प्रकरण असो किंवा कोलकत्तामधली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे. या घटनांचे पडसाद देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ करंजाडे आयोजित केलेल्या गावदेवी क्रिकेट संघ करंजाडे माजी सरपंच दहीहंडी उत्सवामध्ये कळंबोली येथील जंक्शन दहीहंडी पथकाने महिला अत्याचार फालकाद्वारे जनजागृती फलक दर्शवीत महिला अत्याचाराचा निषेध करत सलामी दिली.
करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष मा. सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दहीहंडी उत्साहात पार पडली. यावेळी या मानाची दहीहंडी मुंबई येथील निर्धास्त गोविंदा पथक मुंबई पथकाने दहीहंडी फोडली. याप्रसंगी कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष उद्योजक जे.एम.म्हात्रे, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, जितेंद्र म्हात्रे, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, पोलीस पाटील कुणाल लोंढे, महेश शाळुंखे, सर्वं महिला यांच्यासह रिल्स स्टार आणि yotuber साक्षी देशमुख यांनीही उपस्तिती दर्शवली. यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी पनवेल विभागाच्या पोलिसांनी यांनी कार्यक्रमप्रसंगी भेट दिली. यावेळी रिदम इव्हेंन्ट प्रस्तुत विशाल सावंत निर्मित आला रे आला गोविंदा आला आर्केस्ट्रा संगीताच्या तालावर गोविंदा पथकाने ठुमका धरला.
माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ करंजाडे आयोजित गावदेवीक्रिकेट संघ करंजाडे "माजी सरपंच" दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई, ठाणे, कर्जत, पनवेल, नवी मुंबईतील सुमारे 20 ते 25 दहीहंडी पथकाने चार, पाच, सहा, आठ थरांची सलामी दिली. यावेळी सलामी देण्याऱ्या पथकाचे आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर यावर्षी मुंबई येथील निर्धास्त गोविंदा पथक मुंबई पथकाने सलामी देत करंजाडेतील "माजी सरपंच दहीहंडी" फोडली. यावेळी मा सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले की करंजाडे वसाहतीमध्ये माजी सरपंच दहीहंडी चे आयोजन केले असल्याचे आंग्रे यांनी सांगितले. तसेच मित्रपरिसरासह करंजाडेकर, प्रशासन व पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.