घरकुल हौसिंग काँम्पलेक्सची वाटचाल रीडेव्हलपमेंटकडे...!!

 घरकुल हौसिंग काँम्पलेक्सची वाटचाल रीडेव्हलपमेंटकडे...!!


खारघर (प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिकेने या संकुलाला २०१७ साली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लगेचच संकुलातील सर्व इमारती धोकादायक असल्याच्या नोटीसा दील्या असून रहिवाश्यांनी सोसायटी आणि फेडरेशनच्या माध्यमांतून पनवेल महानगरपालिकेकडे स्ट्रक्चरल आॕडीटची काॕपी मागून कोणत्या आधारे आपण या इमारती धोकादायक ठरवील्या याची माहिती मागवीली असता पालिका प्रशासनाची बोलती बंद झाली;पण त्यांनी या नोटीसा मागे घेतल्या नाहीत.या अनुषंघाने घरकुल संकुलातील रहिवाश्यांनी सोसायटी आणि फेडरेशनच्या माध्यमांतून रीडेव्हलपमेंट करण्याचा विचार सुरू केला असून चारी सोसायट्यानमध्ये यासंदर्भात बैठका पार पडल्या असून सर्व सभासदांनी याची नोंद घेऊन येथून पुढे होणाऱ्या सर्व बैठकांना उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.