खारघरमधील इयत्ता १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना सौ.उषा अजित अडसुळे यांच्याकडून शैक्षणिक टॕबचे प्रोत्साहनापर मोफत वाटप
खारघर(प्रतिनिधी)- शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे आणि खारघर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ.उषा अडसुळे यांच्या वतीने खारघरमधील १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॕबचे प्रोत्साहनत्पर मोफत वितरण करण्यात आले.पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील सेक्टर-२,८,१०,१५,१६,१७ आणि १८ मधील ९०% च्या वरती गुण मीळवीणाऱ्या विद्यार्थ्यांना सेक्टर-८ मधील शारदा सदन या सभागृहात एका भव्य समारंभात या टॕबचे वितरण करण्यात आले.
माजी आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डाॕ.प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.व्यासपीठावरती खारघर काॕलनी फोरमच्या अध्यक्षा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर संघटीका सौ.लिना गरड,शेकापच्या खारघर शहर महिला अध्यक्षा सौ.तेजस्वी घरत,देवेंद्र मढवी,अशोक गिरमकर,सौ.श्रद्धा सावंत,जगदीश घरत,प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुनिल पाठक,कल्पेश तोडेकर,जयेश ठाकूर,प्रतिक ढोबळे आणि सुमीत ठाकूर यांनी परिश्रम घेतले.शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे आणि खारघर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ.उषा अडसुळे यांच्या वतीने खारघरमधील १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॕबचे प्रोत्साहनत्पर मोफत वितरण करण्यात आले.पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील सेक्टर-२,८,१०,१५,१६,१७ आणि १८ मधील ९०% च्या वरती गुण मीळवीणाऱ्या विद्यार्थ्यांना सेक्टर-८ मधील शारदा सदन या सभागृहात एका भव्य समारंभात या टॕबचे वितरण करण्यात आले.
माजी आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डाॕ.प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.व्यासपीठावरती खारघर काॕलनी फोरमच्या अध्यक्षा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर संघटीका सौ.लिना गरड,शेकापच्या खारघर शहर महिला अध्यक्षा सौ.तेजस्वी घरत,देवेंद्र मढवी,अशोक गिरमकर,सौ.श्रद्धा सावंत,जगदीश घरत,प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुनिल पाठक,कल्पेश तोडेकर,जयेश ठाकूर,प्रतिक ढोबळे आणि सुमीत ठाकूर यांनी परिश्रम घेतले.भरत मगदुम यांनी आपल्या अमोघ वाणीने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.