पनवेल मनपाच्या शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम;रक्षाबंधनाचे औचित्य साधून एक राखी सैनिकांसाठी उपक्रम
पनवेल, दि.20 : माननीय आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रेरणेने, रक्षाबंधनाचे औचित्य साधून एक राखी सैनिकांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 05, जीवन शिक्षण विद्यामंदिर, मोठा खांदा पनवेल येथे घेण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्या सहकार्याने तसेच शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण व अधीक्षक शिक्षण विभाग किर्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांच्या प्रति आदर व स्नेह व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शाळा क्रमांक 05 जीवन शिक्षण विद्यामंदिर मोठा खांदा, पनवेल या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वतः राख्या तयार केल्या. मुख्याध्यापिका शुभा आवाड यांनी दीप्ती अंबावणे, सुनीता बडे,अंजली देसाई, निलोफर शेख, देवांगना मुंबईकर,जयश्री खांडेकर या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या. या उपक्रमास विशेष सहकार्य व समन्वय शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश रामचंद्र आलदर यांनी केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या राजस्थान मधील कोटा येथील सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत.