सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांचा लिलाव

 सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांचा लिलाव


नवी मुंबई, दि.12 :- सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या  01 कार, 04 मोटारसायकल  अशा एकूण 05 बेवारस वाहनांचा दि. 16 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सीबीडी पोलीस ठाणे नवी मुंबईचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

सीबीडी  पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 01 कार, 04 मोटारसायकल  अशी एकूण 05 बेवारस वाहने सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र  करुन ठेवण्यात आली आहेत.  या वाहनांच्या मूळ मालकांचा  अथवा ताबा धारकांचा  सर्वत्र तपास करण्यात आला असून, या बेवारस वाहनांसाठी कोणीही मालकी हक्क दाखविलेला नाही.  त्यामुळे  या वाहनांचा लिलाव करण्याकरिता उपप्रादेशिक विभागाकडून वाहनांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या 05 वाहनांची तपशीलवार माहिती  सीबीडी पोलीस ठाण्यात उपलब्ध आहे.

            या लिलावात जास्तीत जास्त स्क्रॅप खरेदी विक्री करणाऱ्या शासनमान्य व्यवसायिकांनी  सहभाग घ्यावा, असे आवाहन सीबीडी पोलीस ठाणे नवी मुंबईचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.   


                                                                            

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image