घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन


*घरो घरी तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेच्यावतीने तिरंगा मॅरेथॉन*

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन



पनवेल, दि. ११: माननीय आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ११ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने 'घरोघरी तिरंगा' या उपक्रमांतर्गत तिरंगा सन्मानार्थ 'तिरंगा मॅरेथॉन'  आज काढण्यात आली.  'भारत माता की जय', वंदे मातरमच्या घोषणा देत महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पर्यंत या तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. 

केंद्र शासनाच्या 'घरोघरी तिरंगा' उपक्रम अंतर्गत आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या नेतृत्वाखाली 'तिरंगा मॅराथॉन' आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे 400 हून अधिक विद्यार्थी, नागरिक,  महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि स्वच्छतादूत यांनी सहभाग घेतला.पनवेल महानगरपालिका कार्यालय- जय भारत नाका-स्वातंत्र्यवीर सावरकर चौक- बल्लाळेश्वर मंदिर- के. वि. कन्या शाळा- या मार्गे  जाऊन शेवटी वडाळे तलाव येथे मॅराथॉनची सांगता झाली .

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन निमित्ताने  शासन निर्देशानूसार 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रात  ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत 12 ते 14 ऑगस्ट रोजी बचतगटामार्फत 'तिरंगा मेला 'चे आयोजन करण्यात येणार  आहे. दिनांक 13 ऑगस्ट  रोजी ‘देवकी मीडिया प्रस्तुत “ऐ वतन तेरे लिये” या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजीतिरंगा सन्मानार्थ बाइक व सायकल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. 

याबरोबरच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी  दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट  असे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवावा. त्यासोबतचे स्वत:चे सेल्फी काढून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड  करावे असे  आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे. 

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने  महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या ' घरोघरी तिरंगा ' या उपक्रमात  नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image