नामदार महेश शिंदे यांचा नवी मुंबईत नागरी सत्कार

नामदार महेश शिंदे यांचा नवी मुंबईत नागरी सत्कार


नवी मुंबई (प्रतिनिधी)- कोरेगांव-खटावचे आमदार सन्माननिय महेश शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी,मंत्री दर्जा निवड झाल्यानिमित्त या मतदारसंघाच्या मुंबई आणि नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता.याप्रसंगी कोरेगांव-खटावच्या नागरिकांसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नामदार महेश शिंदे साहेबांचे हितचिंतक मोठ्या संख्येने नागरी सत्कारास स्वयंस्फुर्तीने हजर राहीले होते.

      हा सत्कार समारंभ वाशीस्थित पामबीच रोडवरील शिवम काँम्पलेक्समधील भव्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.