न्हावा गावातील महिला पदाधिकाऱ्यांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी-जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले स्वागत

न्हावा गावातील महिला पदाधिकाऱ्यांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी-जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले स्वागत



उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )विधानसभेच्या  निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमधे देशात व राज्यात कॉंग्रेस पक्षाने मुसंडी मारल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याने विविध पक्षातील महिला व युवक कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. न्हावा गावातील शेकापक्षाच्या नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून न्हावा महिला मंडळाच्या लढाऊ नेत्या श्रीमती. शांताबाई म्हात्रे श्रीमती. रमाबाई पाटील,  निर्मलाताई ठाकूर यांनी आज कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेत्तृवाखाली कॉंग्रेस पक्षामधे प्रवेश केला. यावेळी जेष्ठ कॉंग्रेस नेते किसन पाटील, न्हावा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश म्हात्रे,राजेश म्हात्रे व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कॉंग्रेस पक्ष नेहमीच महिलांना व युवकांना पक्ष संघटनेत सन्मान देत असतो आपलाहि या पक्षामध्ये सन्मान राखला जाईल असे आश्वासन या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी दिले. व स्वगृही परत आल्या बद्दल त्यांचे मनापासून स्वागत केले.
Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image