उरणचा आमदार इंडिया आघाडीचाच - नरेशशेठ घरत

 उरणचा आमदार इंडिया आघाडीचाच - नरेशशेठ घरत




उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना उरण विधानसभा मतदारसंघातून १३ हजार पेक्षा जास्त आघाडी मिळवून दिली असून येत्या विधानसभा निवडणुकीतही उरण मधून महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणणार असे स्पष्ट प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेशशेठ घरत यांनी केले.विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने शेकाप मध्ये नाराजीचा सूर उमटला होता
दुसरऱ्या दिवशी भाई जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरवली यात शेकाप इंडिया आघाडीचाच भाग असून विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष हा कॉंग्रेस,शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी (शरद पवार) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आप, सपा व इतर मित्र पक्षांसोबत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.२ दिवसांपूर्वी शेकापचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी इंडिया आघाडी बद्दल जे मत मांडले होते ते त्यांचे वैयक्तिक मत असून वरीष्ठ पातळीवर इंडिया आघाडीचे नेते उरणमधून जो उमेदवार देतील त्याचे काम शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिक पणे करेल आणि उरणचा आमदार महाविकास आघाडीचाच असेल असे शेवटी नरेश शेठ घरत यांनी सांगितले.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image