नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाशीमध्ये अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत
नवी मुंबई महानगरपालिका सी - विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी 1 (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत करण्याची धडक कारवाई नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही कारवाई वाशी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली.
यामध्ये - मे. साई दर्शन को. ऑप. हौ. सो. लि. भुखंड क्र. 26, सेक्टर- 14, वाशी येथील 16 फ्लॅट्सचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
तसेच - मे. सुवर्णसागर (VS II) टाईप ओनर्स असो. भुखंड क्र. 3, सेक्टर-9, वाशी मधील 64 फ्लॅट्सचाही पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे सी-2/1 ते सी-2/10, सेक्टर-16, वाशी येथील 160 फ्लॅट्सचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
अशाप्रकारची धडक मोहीम पाणी पुरवठा विभागाचे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी – कर्मचारी आणि अतिक्रमण पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आली. या धडक मोहीमेसाठी 7 मजूरांचा वापर करण्यात आला.
यापुढील काळातही अशा प्रकारे तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे.