स्व.धर्मा सुदाम पाटील यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न

स्व.धर्मा सुदाम पाटील यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न


खारघर (प्रतिनिधी)- मुर्बी गावातील स्वर्गिय धर्मा सुदाम पाटील यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा काल गुरूवार दिनांक २५ जूलै रोजी विविध धार्मिक विधी आणि भजन संगीताने साजरा करण्यात आला.

      सकाळी ९ वाजता प्रतिमा पूजन आणि हिंदु धर्माच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर १० वाजता ह.भ.प.निलेश महाराज कोरडे यांचे किर्तन झाले.या किर्तनात रमेश महाराज तांबडे यांनी गायनाची साथ दीली तर पखवाज वादन एकनाथ बुवा भाग्यवंत यांचे लाभले.आणि किर्तन साथ पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळींची लाभली त्यामध्ये मुर्बी,खारघर,कोपरा,बेलपाडा,रांजणपाडा,पेठ,ओवे,ओवे कँप,खुटूकबांधण,पापडीचा पाडा,तळोजे,मजकूर आणि पेंधर येथील जुने-जाणते वारकरी होते.

      तसेच सायंकाळी ६ ते ८ या वेळेत वेगवेगळ्या ५ भजनी मंडळांच्या चक्रीभजनाचे आयोजन केले होते,यामध्ये अशोक बुवा पाटील,विश्वनाथ बुवा ठाकूर,जनार्दन बुवा पाटील,मिलिंद बुवा करावकर,कैलास बुवा पाटील यांना पखवाजाची साथ अनुक्रमे सोनू पाटील,गोरख पाटील,रोहीदास पाटील,जगदीश करावकर आणि चेतन पाटील यांनी दीली.

      उपस्थित सर्व मान्यवरांसाठी दीवसभर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.आषाढातील मुसळधार पाऊस असताना सुद्धा या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी दिवसभर हितचिंतकांची रांग लागली होती.

      पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती,नगरसेवक सन्माननिय अभिमन्यूशेठ पाटील यांचे स्वर्गिय धर्मा सुदाम पाटील हे तिर्थरूप.त्यामुळे काल खारघर नोडमधील मुर्बी गावात नवी मुंबई आणि पनवेल तालुक्यातील त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी या पुण्यस्मरण सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवून अभिमन्यूशेठ पाटील यांच्याशी असणारे आपले ऋणानुबंध जोपासले.