मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू


नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  11 हजार 598  मते वैध ठरली तर 402  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   5 हजार 800   इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 

बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83  मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.  



Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image