शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे अधिव्याख्याता पदांसाठी शुक्रवारी 11 वाजता मुलाखती

शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे अधिव्याख्याता पदांसाठी शुक्रवारी 11 वाजता मुलाखती


रत्नागिरी, दि. 10 (जिमाका) : शासकीय  तंत्रनिकेतन येथे विविध अभ्यासक्रमांकरिता तात्पुरत्या स्वरुपात  तासिका तत्वावर अधिव्याख्यता पदांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षाकरिता नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. रा.के. वाकोडकर यांनी कळविले आहे.

स्थापत्य, उपयोजित यंत्रशास्त्र, संगणक, विद्युत, अणुविद्युत, यंत्र, मेकॅट्रॉनिक्स या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता बी.ई, प्रथमश्रेणी, औषधनिर्माणशास्त्र साठी बी.फार्म प्रथमश्रेणी, इंग्रजी, गणित,रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र साठी एम ई प्रथम श्रेणी, एम.एससी प्रथमश्रेणी आवश्यक.

तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मुळ प्रमाणपत्र व  झेरॉक्स प्रतीसहित 12 जुलै रोजी सकाळी 11 वा. मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 

स्थापत्य, उपयोजित यंत्रशास्त्र, विद्युत,  शास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यांनी मुख्य इमारत संबंधित विभाग तर संगणक, अणुविद्युत, यंत्र, मेकॅट्रॉनिक्स यांनी विस्तारीत इमारत संबंधित विभाग येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image