पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय जगताप यांच्या सेवानिवृत्त प्रसंगी सत्कार समारंभाचे आयोजन


पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय जगताप यांच्या सेवानिवृत्त प्रसंगी  सत्कार समारंभाचे आयोजन



पनवेल, दि. २९: पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय जगताप  व पाणीपुरवठा विभागातील मजूर दिलीप घोडेकर यांच्या सेवा निवृत्ती प्रसंगी दिनांक २८ जून रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहांमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन  सन्मानित करण्यात आले.  

यावेळी आयुक्त श्री. मंगेश चितळे, माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक,उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सुधीर सांळुखे, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते. 

यावेळी आयुक्त श्री. मंगेश चितळे म्हणाले, महापालिकेच्या विविध विकासांमधून शहर अभियंता संजय जगताप यांचे उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य दिसून आले आहे. यामध्ये महापालिकेच्या नवीन इमारत बांधणीमधील त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ही प्लॅटिनम रेटिंगची ग्रीन बिल्डिंग उभारताना प्रत्येक टप्प्यावर त्यांचा मोठा वाटा आहे. अजून एकदा त्यांनी आमच्या सोबत काम करावे अशी इच्छा यावेळी आयुक्तांनी व्यक्त केली. 

या बरोबरच माजी सभागृह व माजी नगरसेवक यांनीही शहर अभियंता संजय जगताप यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करत अजून दोन वर्ष तरी महापालिकेसोबत काम करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

यापूर्वी महाड नगर परिषदेत कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेस सुरुवात केलेल्या संजय जगताप यांनी नवघर माणिकपूर नगर परिषद, वसई-विरार महानगरपालिकेमध्ये आठ वर्षे व पनवेल महानगरपालिका या ठिकाणी तीन वर्षे शहर अभियंता म्हणून सेवा बजावली. 

याचबरोबर यावेळी पाणीपुरवठा विभागातील मजूर दिलीप घोडेकर यांना २३ वर्षे सेवा दिल्याबद्दल भविष्य निर्वाह निधी धनादेश व प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image