नेरुळ विभागात अनधिकृत धाब्यांवर धडक कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी- नवी मुंबई महनगरपालिका कार्यक्षेत्रातील बी विभाग नेरुळ कार्यालयांतर्गत महात्मा गांधी नगर डी ब्लॉक येथील एच पी कंपनीच्या पाईपलाईन वर असलेले अनधिकृत धाबे दि. 11 जून 2024 निष्कासित करण्यात आले. उप आयुक्त अतिक्रमण डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार बी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे धाबे हटविण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बी विभाग कार्यालय नेरुळ येथील अतिक्रमण विभागचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे अशाच मोहिमा तीव्र करण्यात येणार आहेत.