उध्दव साहेबांना वैचारीक वारसासाठी फडणवीसांच्या दाखल्याची गरज नाही

उध्दव साहेबांना वैचारीक वारसासाठी फडणवीसांच्या दाखल्याची गरज नाही


बाळासाहेबांचा वैचारिक वारसा उद्धवजी ठाकरे नसून एकनाथ शिंदे असल्याचा भंकपपणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी खारघर येथील प्रचार सभेत केला.

ज्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला त्या शिंदेंची सेना ही खरी सेना असल्याची वकिली करत फडणवीस आज महाराष्ट्रभर फिरत आहे. 

फडणवीसांना खरेतर बाळासाहेब  कधी कळलेच नाही, त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा अणि त्यांचा दूरपर्यंत काडीमात्र संबंध नाही. 

साहेबांनी नेहमी निष्ठेला प्राधान्य दिले, निष्ठेच्या बळावर  सामान्य शिवसैनिक आमदार खासदार झाले. साहेबांच्या विचारात संघर्ष होता, लढाऊ बाणा होता. दुर्दैवाने फडणवीसांच्या नादाला लागून शिवसेनेसोबत गद्दारी करत सुरत पळून जाणाऱ्या शिंदेमध्ये तो लढाऊ बाणा कधी दिसला नाही, जो पळून जातो तो शिवसैनिक कसला. ह्याउलट बाळासाहेबांचे सच्चे वैचारिक वारसदार असलेले उद्धव साहेब ह्या 40 गद्दार अणि भाजपाविरोधात शद्दू ठोकून मैदानात उतरले, कारण संघर्ष हा त्यांच्या रक्तात आहे. बाळासाहेब कधीही सत्तेसाठी लाचार झाले नाहीत, त्याचप्रमाणे सच्चे वारसदार असलेल्या उद्धवजी भाजपच्या षडयंत्राला भीक न घालता क्षणात सत्ता सोडून मातोश्रीला आले. ह्याउलट मुख्यमंत्री पदासाठी नकली शिवसेनेच्या शिंदेनी स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केली अणि इमान विकले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका नावाला संपवण्यासाठी संपूर्ण देशातील भाजापा कामाला लागली तरी उद्धव साहेब काही संपले नाहीत. ह्याउलट जास्त ताकदीने उद्धव साहेबांनी भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारसा उद्धवजी सक्षमपणे चालवत असून महाराष्ट्रातील जनतेची उदंड साथ उद्धवजींना लाभत आहे. 

सत्तेसाठी हपापलेल्या फडणवीसांनी विचारसरणी अणि नितीमत्ता बाजूला सारत पक्षफोडून वैचारीक दिवाळखोरी सिद्ध केली. त्यामुळे बाळासाहेबांचा खरा वैचारीक वारसा सिद्ध करण्यासाठी रात्रीच्या अंधारात वेश बदलून पक्ष फोडणाऱ्या फडणवीसांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही.


-------

मंगेश आढाव

शिवसेना पनवेल महानगर प्रवक्ते

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image