बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत हॉटेल, बार, पब वर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर विभागातील 03 लेडीज बार / पब, 01 ढाबा, 03 चायनीज तसेच तुर्भे विभागातील 03 पब / बार यांच्यावर 28 मे रोजीच्या रात्रीपासून व पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली. या कारवाईपोटी रु. 1 लाख इतकी दंडात्मक वसूली करण्यात आली. सदरची कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
सदर मोहीम अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त श्री.शशिकांत तांडेल, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री.सागर मोरे, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.भरत धांडे आणि अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्या सहयोगाने करण्यात आली.
यापुढेही अशीच तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.