बेलापूर विभागात अनधिकृत झोपड्यावर धडक कारवाई


                                                  

बेलापूर विभागात अनधिकृत झोपड्यावर धडक कारवाई




 

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालयाअंतर्गत बेलापूर ब्रिजखाली, बेलापूर, नवी मुंबई येथे अनधिकृतपणे झोपड्या उभारण्यात आलेल्या होत्या.

मा.आयुक्त सो यांच्या आदेशान्वये व मा.उप आयुक्त् यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे श्री.शशिकांत तांडेल (सहा. आयुक्त् तथा विभाग अधिकारी) यांच्या नियंत्रणाखाली सदर बेलापूर ब्रिजखाली, बेलापूर, नवी मुंबई येथील 48 अनधिकृत झोपड्या अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन निष्कासित करण्यात आल्या आहेत. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर मधील अधिकारी/ कर्मचारी श्री. मयुरेश पवार (कनिष्ठ् अभियंता), श्री. स्वप्निल तारमळे (वरिष्ठ् लिपिक), श्री. नयन भोईर (लिपिक) मजूर 10, जे.सी.बी - 01, पिकअप-01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

 

 

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image