बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवर वर करवाई करण्याची पत्रकार संघर्ष समितीची मागणी

बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवर वर करवाई करण्याची पत्रकार संघर्ष  समितीची मागणी




पनवेल दिनांक २० प्रतिनिधी
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज  दुर्घटनेची घटना पनवेल महापालिका हद्दीत होऊ नये याकरिता , पनवेल महानगर पालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डींज ,मोबाईल टॉवर तातडीने काढण्याचे  आदेश द्यावेत  अशा आशयाचे निवेदन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल महापालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे दिले आहे   .  ,
        होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना ,अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे याला मुख्य कारण म्हणजे स्थैर्यता प्रमाण पत्र नसणे , तज्ज्ञांकडून होर्डिंग्ज चे डिझाईन न करणे ,वेळोवेळी त्या होर्डिंग्ज ची  न तपासणी करणे ,स्ट्रॅकचर  ऑडिट न  करणे  तसेच बाह्य जाहिराती करताना उभारलेले होर्डिंग्ज यांचे आकार मर्यादित नसणे त्या भागातील वाहणारे  पावसाळी वादळ वारे यांचा आढावा घेऊन आकार ठरवून न देणे  अशी विविध करणे अपघातास कारणीभूत असून यामुळे  निरपराध नागरिकांचे नाहक बळी जात आहेत .
      या निवेदनाद्वारे अशी विनंती करणेत येत आहे कि १)  पनवेल महापालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश आपल्या स्तरावर द्यावेत , २) महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मोबाइलला टॉवर तातडीने काढावेत ,३) ब्युरो ऑफ  इंडियन स्टॅंडर्ड या राष्ट्रीयकृत  जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारे परवाना धारक होर्डिंग्ज ची तपासणी करावी त्यात  तफावत   असल्यास ते होर्डिंग्ज हि तातडीने काढण्यात यावेत ,४)स्टॅबिलिटी  सर्टिफिकेट महापालिका अभयंत्याकडून तपासून घेण्यात यावेत अथवा महापालिका अभियंत्यांकडून  फेर तपासणी करावी तसा अहवाल सादर करून ठेवावा दुर्घटना घडल्यास महापालिका अभियंत्यांवर हि कारवाई करावी  ५)ज्या होर्डिंग्ज ला महापालिकेने परवानगी  दिली आहे त्या होर्डिंग्ज ची दरवर्षी / वेळोवेळी डागडुजी करणे परवानाधारकाला बंधनकारक करावे ,कुठे वेल्डिंग निखळली  असेल , कुठे बेसमेंट जवळ अनेक वेळा खोदकाम होते ,सिमेंट निघते ती दुरुस्त करण्याच्या सूचना द्यावेत ,५ ) पनवेल महापालिका हद्दीत डिजिटल  जाहिरात  फलक लावण्यात आले आहेत  असे डिजिटल फलक वाहनधारकांचे आणि नागरिकांचे विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरत आहेत अशा फलकाचे जाहिरात धोरण ठरवुन त्यांना हि यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देष द्यावेत   ६ ) ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारल्या आहेत त्या इसमांवर फोजदारी कारवाई करावी तसेच उभारलेली होर्डिंग काढण्याचा खर्च वसूल  करण्यात यावा . अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेला दिले आहे .

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image