महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात प्रतिमा पूजनाव्दारे अभिवादन
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, द्रष्टे समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात व श्री. नैनेश बदले, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.