फडणवीसांची कोटी कोटी उड्डाणे, पण मालमत्ता करा बाबत दिलासा न देता 2,80,000 मालमत्ता धारकांच्या तोंडाला पुसली पाने
आज खारघर येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी मोदी सरकारच्या कार्याची स्तुती करत हजारो लाखो कोटींच्या योजनांची माहिती देत प्रचार केला. हजारो लाखो कोटींचे आकडे एकायला जरी चांगले वाटत असले तरी प्रत्यक्ष पनवेल मधील जनतेच्या पदरात गेल्या पाच वर्षात काहीच पडले नाही.
ह्याउलट जनतेच्या इच्छेविरोधात जाऊन केंद्र सरकारद्वारा खांदेश्वर अणि मानसरोवर रेल्वेस्थानक परिसरात पंत प्रधान आवाज योजना राबवली जात आहे. ह्या योजनेला स्थानिक रहिवाश्यांचा विरोध आहे. परंतु गेल्या पाच वर्षात स्थानिक आमदार अणि खासदार ह्यांनी जनतेला ह्या प्रकल्पाविरोधात काहीं मदत केली नाही. सोयीस्करपणें जनतेच्या मागणीकडे आमदार प्रशांत ठाकूर आणि खासादर श्रीरंग बारणे ह्यांनी दुर्लक्ष करत हा प्रकल्प रेटून नेला. आज उपमुख्यमंत्र्यांकडून ह्या बाबत काही दिलासा मिळाला असता बरे वाटले असते.
तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आवाजवी बेकायदेशीर मालमत्ता करविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून ९० टक्के मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही. 2,80,000 मालमत्ताधारकांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या मालमत्ता कराच्या विषयावर आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे ह्यांनी जनतेला दिलासा दिलेला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आसलेल्या भाजपाला मालमत्ता करामधून जनतेला दिलासा देणे सहज शक्य होते, परंतु पनवेलच्या जनतेला जाणीवपूर्वक गृहीत धरण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी आणि भाजप नेत्यांकडून केले गेले. आजच्या सभेमध्ये देखील फडणवीसांनी जाणीवपूर्वक मालमत्ता कराबाबत काहीं विधान न करता पनवेलच्या जनतेला मालमत्ता कर प्रश्नाबाबत वाऱ्यावर सोडले आहे.
मोठे मोठे भाषणे अणि कोटींची आकडे सांगून मालमत्ता करासारख्या मूळ मुद्द्यांवर दुर्लक्ष करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला जनतेला निवडणुकीमध्ये योग्य जागा दाखवून आपला असंतोष नक्की व्यक्त करेल.
---------
मंगेश आढाव
शिवसेना पनवेल महानगर प्रवक्ते