काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान!

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान!





उरण दि १५(प्रतिनिधी)-होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पद देऊन त्यांना कार्यरत करण्यासाठी तसेच महिलांचा आत्मसन्मान वाढावा, महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं याकरिता उरण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा रेखाताई घरत यांच्या पुढाकाराने रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना शेलघर येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.

चिरनेर विभागीय महिला काँग्रेस अध्यक्षा पदी सारिका महेश पाटील, जासई विभागीय महिला काँग्रेस अध्यक्षा पदी विद्या विकास पाटील, उरण तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्षा पदी  प्रतिभा चंद्रकांत पाटील, उरण तालुका महिला काँग्रेस चिटणीस पदी विजया महेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण तालुका महिला उपाध्यक्षा निर्मला पाटील, जासई विभागीय काँग्रेस अध्यक्ष विनोद पाटील, पागोटे गांव काँग्रेस अध्यक्ष  सुजित पाटील आदी उपस्थित होते.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image