बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग बेलापूर कार्यालया अंतर्गत करावे गांव नवी मुंबई श्री. संताजी बळीराम नाईक, घर क्र- 873, सेक्टर-36, करावे गांव, नवी मुंबई व श्री. आदेश वाघमारे, घर क्र-404, सेक्टर-20, बेलापूर गाव, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम सुरु असून सदरच्या बांधकामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु केले होते.
सदर अनधिकृत बांधकामास ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदर श्री. संताजी बळीराम नाईक, घर क्र- 873, सेक्टर-36, करावे गांव, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच श्री. आदेश वाघमारे, घर क्र-404, सेक्टर-20, बेलापूर गाव, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम सिडको व नमुंमपा यांच्या संयुक्त मोहिमेत निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी ए विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर मधील अधिकारी/ कर्मचारी, मजूर 10, गॅसकटर 01, इलेक्ट्रीक हॅमर 03, पिकअप 01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.