पनवेल महानगरपा
पनवेल मध्ये तृतीय पंथीय बैठक ,सायकल रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती
पनवेल,दि.६: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत ३३ मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक ६ एप्रिल रोजी प. जो. म्हात्रे विद्यालय नावडे यांच्या सहकार्याने प्रभाग समिती अ उप विभाग नावडे विभागामध्ये सायकल रॅली च्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. प्रभाग ड मध्ये पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच दिनांक ५ एप्रिल रोजी संघ (शहरी) प्रधानमंत्री आवास योजना विभाग मार्फत शाळा क्रमांक १० मध्ये तृतीय पंथीयांची बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची(सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम )अमंलबजावणी 33 पनवेल विधानसभा मतदारसंघ 188 अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ व स्वीप पथक प्रमुख अधिकारी, पालिका मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले हे कार्यक्रम केले जात आहेत.
आज दिनांक 6/4/2024 रोजी 33 मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत 188 - पनवेल विधानसभा मतदार संघ अनुषंगाने प. जो. म्हात्रे विद्यालय नावडे यांच्या सहकार्याने प्रभाग समिती अ उप विभाग नावडेमध्ये सायकल रॅली काढून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली. तसेच पनवेल महानगरपालिका, तहसिल कार्यालय व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन ,नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानातून नवीन पनवेल येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याबरोबरच महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना विभागाच्यावतीने तृतीय पंथीयांची बैठक घेऊन त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच त्याची मतदार नोंदणी करण्यात आली.