लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पुरवठा साखळी व्यवस्थापन अँपद्वारे हॉटेल व्यावसायिकांसह मद्यविक्री करणाऱ्यांवर राहणार करडी नजर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पुरवठा साखळी व्यवस्थापन अँपद्वारे हॉटेल व्यावसायिकांसह मद्यविक्री करणाऱ्यांवर राहणार करडी नजर

पनवेल दि. ०५(प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल व्यावसायिक व मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर आत्ता निवडणूक आयोगाद्वारे  पुरवठा साखळी व्यवस्थापन अँप सुरु करण्यात आले असून या अँप मध्ये आत्ता दररोजची मद्य खरेदी व विक्रीची माहिती संबंधित व्यावसायिकांना द्यावी लागणार असल्याने आत्ता यापुढे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा महापूर व वाटप कुठल्याच पक्षाला करता येणार नाही आहे.

             सर्वच हॉटेल व मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आत्ता सप्लाय चैन मॅनेजमेंट अँप द्वारे दैंनदिन मद्य खरेदी व विक्रीची माहिती द्यावी लागणार आहे. व या माहितीवर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष राहणार आहे. या अँप मुळे चोरून दारू खरेदी विक्री, बनावट भेसळयुक्त दारू विकता येणार नाही तसेच एखाद्याची नेहमी पेक्षा जास्त मद्य विक्री दिसून आल्यास त्याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे. व त्याने विशिष्ट फायद्यासाठी विशिष्ट लोकांना प्रमाणापेक्षा जास्त मद्य विक्री केली असेल तर संबंधितांचे लायसन्स सुद्धा निलंबित होण्याची दाट शक्यता आहे. या अँप मुळे आत्ता मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरळीत व सुरक्षित दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलामध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होणार आहे. व या कारभारात पारदर्शकता येत असल्याचे मत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image