महापालिका क्षेत्रातील मान्सून पूर्व कामाला प्रारंभ करा!;पनवेल संघर्ष समितीची मागणी

महापालिका क्षेत्रातील मान्सून पूर्व कामाला प्रारंभ करा!;पनवेल संघर्ष समितीची मागणी



पनवेल: दरवर्षी पावसाळ्यात शहरे आणि गावे तुंबली जातात. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. सांडपाण्याची यंत्रणा कोलमडलेली असते. नाले सफाईचा बोऱ्या वाजलेला असतो. प्लास्टिक कचऱ्याने नाले गुदमरलेले असतात. त्याकडे आताच लक्ष देणे अनिवार्य असल्याचा दावा करत पनवेल संघर्ष समितीने पनवेल महापालिकेचे स्वच्छता विभागाचे निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे मान्सूनपूर्व कामाला त्वरित प्रारंभ करून संभाव्य धोके टाळावेत, अशी मागणी केली आहे.
पनवेल संघर्ष समितीचे पनवेल शहर अध्यक्ष हरेश पाटील, नवीन पनवेल शहर अध्यक्ष भूषण साळुंखे, खारघर शहर अध्यक्ष तुकाराम कंठाळे, कळंबोली विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, खांदा कॉलनी अध्यक्ष पंकज कांबळे, तालुकाध्यक्ष डॉ. हेमंत पाटील व किरण करावकर आदींनी संयुक्तिक पत्र देवून नाले सफाई, स्वच्छता आणि वृक्ष छाटणीसह इतर मान्सूनपूर्व कामांवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पनवेल महापालिका प्रशासन आणि आरोग्य व स्वच्छता विभागाकडे केली आहे.
सर्वत्र निवडणुकांचा माहोल सुरु असल्याने नागरी सुविधांचा बोजवारा उडता कामा नये, तसेच मान्सूनपूर्व कामांना 15 एप्रिल पूर्वीच सुरुवात व्हावी असा एक प्रघात असल्याची आठवण त्या पत्रात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी करून दिली आहे.
यावेळी शैलेश गायकवाड यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की, महापालिका स्वच्छतेबाबत जागृत आहेच. मात्र आपण सुचविल्याप्रमाणेच एक दोन दिवसात संपूर्ण महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली जाईल. तसेच इतर विभागांनाही त्या संदर्भात सूचना देतो, असे ते म्हणाले.
Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image