स्वीप कार्यक्रमांर्गत लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्यावतीने मतदार जनजागृती प्रभातफेरी


स्वीप कार्यक्रमांर्गत लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्यावतीने मतदार जनजागृती प्रभातफेरी


पनवेल,दि.03 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत आज  दिनांक 3 एप्रिल रोजी लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा पोदी यांच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. 

यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो..., वोट देने जाना है... देश को आगे बढाना है... आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. यावेळी दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदारांमध्ये  मतदान करण्यासाठी जनजागृती केली.

लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची(सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम )अमंलबजावणी  33 पनवेल अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप, गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच  पालिकेच्या व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची पालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी शाळा व महाविद्यालये, आशा वर्कर, अगंणवाडी सेविका, आदिवासी लोक, जेष्ठ नागरिक, युवावर्ग यासर्वांमध्ये जास्तीत जास्त  मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

त्यानूसार आज लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्यावतीने मतदार जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.  शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.  तसेच येत्या काही दिवसात मतदान जनजागृती या विषयांवर आधारित विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.