पाच वर्षात ११२५ राखीव घरे, प्रत्यक्षात मिळाली १११;नवी मुंबईतील पत्रकारांच्या घरांच्या स्वप्नावर पाणी
नवी मुंबई : नवी मुंबईतील पत्रकारांना सिडको निर्मित घरांच्या लॉटरीमध्ये सुलभतेने घरे मिळावीत म्हणून सिडकोकडून आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.परंतु हे आरक्षण पत्रकारांनासाठी केवळ मृगजळ ठरले असून मागील पाच वर्षामध्ये विविध सोडतीमध्ये पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या एकूण घरांच्या केवळ १० टक्के सदनिका प्रत्यक्षात पत्रकारांच्या पदरामध्ये पडल्या असून उर्वरीत ९० टक्के सदनिका ज्या पत्रकारांना मिळणे हा त्यांचा हक्क होता, त्या सदनिका पत्रकारांच्या हातून सूटून गेल्या आहेत.माहितीच्या अधिकारामधून सदर सांख्यकीय माहिती बाहेर आली असून पत्रकारांकडून वारेमाप प्रसिद्धी करून घेणारे सिडको महामंडळ हे प्रत्यक्षात पत्रकारांना सुलभतेने घरे मिळावित या बाबत मात्र उदासिन असून सिडकोने घरांचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात पत्रकारांच्या हातात बाबाजीचा ठूल्लू दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारण २०१९ नंतर जाहीर झालेल्या मास हौसिग योजनेमधून पत्रकांराना त्यांच्या राखीव कोट्यातून एकही सदनिका मिळालेली नाही.