डॉ. कैलास शिंदे यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

 

                                               

 

डॉ. कैलास शिंदे यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार



 

नवी मुंबई (प्रतिनिधी)-सिडको महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असणारे सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे आणि इतर विभागप्रमुखांनी आयुक्तांचे स्वागत केले.

     भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2013 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असणाऱ्या डॉ. कैलास शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालय व राज्यपाल सचिवालय येथे उपसचिव पदावर उत्तम कामगिरी केलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना 2018 मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील सर्व 685 जिल्हयांमधून प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ जिल्हयाचा गौरव मा. पंतप्रधान महोदय यांच्या शुभहस्ते स्विकारण्याचा बहुमान लाभला तसेच त्यापुढील वर्षीही स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत भारत सरकारमार्फत विशेष पुरस्काराचा मान लाभला. पुढे पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी तेथील आदिवासीबहुल भागात लोककल्याणकारी काम केले. तसेच कोव्हीड काळात व चक्रीवादळातही आपत्ती निवारणाचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल  राज्य व केंद्र सरकारमार्फत घेण्यात येऊन सन्मानित करण्यात आले आहे.

     सिडको महामंडळात सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. कैलास शिंदे यांनी महामुंबई, विमानतळ, गोल्फ कोर्स, निर्मितीत महत्वपूर्ण कार्य करण्यासोबतच वसाहत व पणन, सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा तसेच इर्शाळवाडी पुनर्वसन कार्यातही भरीव कामगिरी केलेली आहे. आपल्या कारकिर्दींत शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी नियोजनबध्द काम केलेले असून शासकीय कामकाज प्रक्रिया ऑनलाईन करुन नागरिकांना कमीत कमी वेळेत व श्रमात आवश्यक सुविधा उपलब्धतेवर त्यांनी भर दिला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर आयुक्तांनी विभागप्रमुखांची बैठक बोलावून प्रत्येक विभागाच्या कामाची माहिती घेतली व विभागनिहाय कामकाजाचा स्वतंत्र आढावा व क्षेत्रभेटींचे नियोजन केले.

 

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image