बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लि.,पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व पिल्लेज महाविद्यालय रसायनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सायक्लोथॉन व मॅरेथॉन स्पर्धा
रसायनी(प्रतिनिधी)- बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट , व पिल्लेज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय रसायनी यांचा संयुक्त विद्यमानाने सायक्लोथॉन व मॅरेथॉन स्पर्धा शनिवार दिनांक १६ मार्च २०२४ रोजी सिध्देश्वरी कॉर्नर ते लोहप गाव पर्यंत आयोजित केले होते तसेच कैरे ,बोरिवली, वाशीवली , वडगाव, तलावली, वाणीवली, लोहप ,इसांबे, माजगाव, आंबिवली या गावा मध्ये प्लास्टिक बंदी जनजागृती करून राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थिनी घरोघरी जाऊन कापडी बॅग वाटप करण्यात आले, विजयी खेळाडूना पारितोषिक , सन्मान चिन्ह, व प्रशितीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , त्या वेळी उपस्थित श्री रवींद्र रघुवंशी प्लांट हेड बिर्ला कार्बन, श्री निखिल भामरे एच आर मॅनेजर बिर्ला कार्बन, श्री अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, सौ रेश्मा कुरूप, अध्यक्ष रोटरी क्लब पाताळगंगा, कलावती उपाध्याय शिक्षिका, श्री लक्षण मोरे, अनिता मॅडम, श्री निलेश जाधव, श्री किशोर पाटील, श्री विजय शिंदे श्री रोहित इंगळे,श्री हरेश जाधव,श्री रोहिदास शिवले, पिल्लेज महाविद्यालयातील इत्यादी पाहुणे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.