मातोश्रींच्या पुण्यस्मरण दिना निमित्त कामगार नेते महेंद्रशेठ घरत करणार कर्तबगार महिलांचा सन्मान

मातोश्रींच्या  पुण्यस्मरण दिना निमित्त कामगार नेते महेंद्रशेठ घरत करणार कर्तबगार महिलांचा सन्मान


उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )मातोश्री स्व.यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिना निमित्त दानधर्मासाठी नावलौकीक असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी महिलांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी शेलघर येथे दुपारी १२ वाजता देवून सन्मानित करणार आहेत. कर्तबगार महिलांना व तरुणांना प्रोस्ताहन देण्याचे काम महेंद्रशेठ घरत नेहमीच करत असतात. यावर्षी विविध क्षेत्रातील १२ महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.विविध सामाजिक संस्थांना धनादेश या प्रसंगी देणार आहेत तसेच महेंद्रशेठ यांच्या सोबत वर्षानुवर्ष काम करणारे सहकारी किरीट पाटील, आनंद ठाकूर यांना घरे बांधून देवून त्यांनी आजपर्यंत महेंद्रशेठ घरत यांना साथ दिल्याची पावतीच जणू ते आपल्या सहकार्याना देत आहेत. आपल्या खांडस येथील फार्महाउसवर देखरेख करणारे लक्ष्मण जडर यांना राहायला स्वत:चे घर नव्हते, महेंद्रशेठ घरत यांनी स्वखर्चाने या वृद्ध जोडप्याला पक्के घर बांधून दिले त्याचे हस्तांतरण ११ मार्च २०२४ रोजी होणार आहे. नेहमी त्यांच्या सोबत फोटोग्राफीसाठी असणारे  लक्ष्मण ठाकूर यांचे स्वत:चे फोटो स्टुडीओ नव्हते हि त्यांची खंत महेंद्रशेठ घरत यांनी जाणून त्यांना उलवे नोड येथे स्वत:च्या जागेत फोटो स्टुडीओ काढून दिला.लक्ष्मण ठाकूर हे तारा गावात रहात असल्यामुळे त्यांना उलवे येथे येणे -जाणे जिकरीचे होते हि अडचण लक्षात घेवून तसेच त्यांच्या मुलीला शहरात शिक्षण घेता यावे यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी रिद्धी सिद्धी हाईट उलवे येथे त्यांना 1BHK प्लॅट सुद्धा दिला त्याचे हस्तांतरण सुद्धा ११ तारखेला होत आहे. मागील वर्षी प्रकाश भगत तसेच आपटा येथील श्रीमती घरटकर यांना सुद्धा स्वखर्चाने  महेंद्रशेठ घरत यांनी घरे बांधून दिली. खऱ्या अर्थाने कर्मवीर अण्णांची शिकवण प्रत्यक्षपणे जगणारे,सर्व राजकारण्यांनी आदर्श घ्यावा असे नेते म्हणजे कामगार नेते महेंद्रशेठ घरत होत.


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image