कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थीने GTI ड्रायव्हर्सचा प्रश्न मार्गी-५००० रुपये पगारवाढ

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थीने GTI ड्रायव्हर्सचा प्रश्न मार्गी-५००० रुपये पगारवाढ








उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )GTI पोर्ट मधे चारशे  ड्रायव्हर्स मे. प्रिती लॉजिस्टीक्स, मे. मोरेश्वर ग्लोबल लॉजिस्टीक्स, मे. ज्योती ट्रान्सपोर्ट व मे. साई शक्ती पोर्ट सर्व्हिसेस या चार कंत्राटदारांमार्फत काम करत आहेत. या ड्रायव्हर्सचा पगारवाढीचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. GTI कंपनीच्या आडमुठ्या  धोरणामुळे मार्ग निघत नव्हता परंतु कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्व कौशल्याने चारही कंत्राटदार व GTI चे राजेश सिंग यांच्या बरोबर यशस्वी चर्चा करून ड्रायव्हर्सना ५००० रुपये पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले.तसा करार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ८.३३% बोनस ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, किमान ३२ रजा, इन्सेन्टिव्ह व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले. या करारनाम्यानुसार कामगारांना जानेवारी २०२३ पासूनचा पगारवाढीचा फरक मिळणार आहे. 
या करारनाम्याप्रसंगी केंद्रीय कामगार उपायुक्त करमसे, NMGKS संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस  वैभव पाटील, कंत्राटदारांतर्फे श्री.अगरवाल, जयवंत आडीवडेकर,अमोल राक्षे, श्री. कुवंर , कु. रसिका म्हात्रे, संतोष मोहिते, बाळूराम शेलार तसेच कामगार प्रतिनिधी महेश घरत, शमिम अन्सारी, गणपत जाधव, मेटकरी मुन्ना, सुभाष यादव, रजाक कुरणे,मयूर चव्हाण, अन्ना वाघमोडे, अशोक गलांडे आदि उपस्थित होते.बराच कालावधी प्रलंबित असलेला पगारवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याने ड्रायव्हर्स कामगारांनी आनंद व्यक्त करून संघटनेचे आभार मानले.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image