जे.एम्.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पी.पी. मुंबईकर वेश्वी शाळेच्या शिक्षिका जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम
उरण दि ५(प्रतिनिधी)-“समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान “ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व कळावे व त्यातूनच उद्याचे भावी पिढीचे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग,अलिबाग,सु.ए.सो.चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कळंबोली,पनवेल व रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ रोजी सु.ए.सो.चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कळंबोली,पनवेल येथे ५१ वे रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पदाजी पांडूरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी तालुका उरण या शाळेतील शिक्षिका रचना अजित ठाकूर यांच्या “ द वर्ल्ड ऑफ डी.एन.ए “ या प्रयोगास प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामूळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.तसेच त्यांनी तालुका स्तरावर सुध्दा प्रथम क्रमांक पटकावला होता.त्याचबरोबर त्यांच्या प्रयोगाची राज्य पातळीवर देखील निवड झाली आहे. ही शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जे.एम्.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक जे.एम्.म्हात्रे (भाऊ),संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रितम जे. म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव जे.के.मढवी ,शाळेचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रितम टकले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तृप्ती म्हात्रे यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.