स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये महापालिकेच्यावतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’


स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये महापालिकेच्यावतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’



पनवेल,दि.9 : पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पनवेल महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचा-यांची स्पर्श अभियानांतर्गत खारघरमध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’स्पर्धा घेण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024  दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहेत. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत आज खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी उपायुक्त गणेश शेटे,मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,डर्मेटॉलॉजी असोशिएशनचे डॉ.कुलकर्णी, अलर्ट इंडिया एनजीओचे अँथनी डिसौजा, महाराष्ट्र कुष्टपिडीत संघटनेचे अध्यक्ष अशोक अंबेकर,रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामदास झोडपे, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आरोग्य् अधिकारी, मुख्यालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी तसेच कर्मचारी, एएनएम,जीएनएम,आशा वर्कर्स, वॉर्ड बॉय, खारघर गाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे उपायुक्त गणेश शेटे यांनी हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेस सुरूवात झाली. स्पगेटी, विबग्योर शाळा, मोनार्च लक्झरी चौक, सेक्टर 18, मुर्बी गाव स्मशान भूमी चौक ,सेंट्रल पार्क ब्रीज येथे संपली. स्पर्धेच्या सुरूवातीला  मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी उपस्थितांना कुष्ठरोगाविषयी जनजागृतीपर माहिती दिली व समारोपावेळी उपस्थितांचे आभार मानले.  ‘कुष्ठरोग निमुर्लनासाठी त्वरा करा, कुष्ठरोगास बहुविध औषधोपचारासाठी प्रवृत्त करा’ अशा आशयाचे फलक यावेळी कर्मचाऱ्यांनी हाती घेतले होते. उपायुक्त गणेश शेटे यांच्या हस्ते मॅरेथॉनमधील विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. 


चौकट

आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024  अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये अलर्ट इंडिया एनजीओचे कमलेश चव्हाण यांनी कुष्ठरोगाबद्दल महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच कुष्ठरोगामागची कारणे, महाराष्ट्रात कुष्ठरोगाचा प्रसार होण्यामागची कारणे व त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या लेप्रसी इलिमिनेशन ॲक्शन प्रोग्रॅम बद्दलची माहिती दिली. 

तसेच वैद्यकिय अधिकारी साथरोग डॉ. आकाश ढासळे यांनी राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये किटकजन्य आजार नियंत्रणाच्या उपाय योजना, त्याचे रिपोर्टिंग, उद्रेक व्यवस्थापन, रेबीज कंट्रोल प्रोग्रॅम, लसीकरण,वायू प्रदूषणाचा मानवी शरीरावरती होणारा परिणाम व उपाययोजना याबाबत माहिती दिली.

यावेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारीडॉ.आनंद गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रेहाना मुजावर, डॉ. उमेश ऐगल, वैद्यकिय अधिकारी डॉ.वैभवी निंबाळकर आणि उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने अर्जुन ठाकूर , सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे एएनएम,जीएनएम, फार्मासिस्ट उपस्थित होते.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image