बारावीच्या परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाबाचे पुष्प देऊन केले स्वागत

 बारावीच्या परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाबाचे पुष्प देऊन केले स्वागत



पनवेल : पनवेल-नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाबाचे पुष्प देण्यात आले.
     आज सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष मयुर तांबडे, उपाध्यक्ष समीर वेशवीकर, सचिव दीपक घरत, सदस्य दीपक जगे, दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, वीरेंद्र लोखंडे यांच्या हस्ते पेन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी केव्ही कन्या आणि व्हीके हायस्कूलचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने पस्थित होते. यावेळी शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पेन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात आले.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image