डी.डब्ल्यू. ए. पनवेल च्या क्रिकेट सामन्यात कलंबोली संघ विजयी.
पनवेल /प्रतिनिधी
डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन पनवेल च्या वतीने पनवेल मधील डॉक्टरांसाठी प्रथमच दिवस आणि रात्र क्रिकेट सामन्याचे आयोजन शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 आणि 25 फेब्रुवारी 2024 अशा दोन दिवस पनवेल तालुक्यातील ओवळे या ठिकाणच्या मैदानावर खेळवण्यात आले. या क्रिकेट सामन्यामध्ये कलंबोली वॉरियर्स संघाने तलोजा टायगर्स या संघावर मात करून विजेतेपद संपादन केले. या क्रिकेट सामन्यांमध्ये करंजाडे लायन्स, कामोठे दबंग, उलवे युनायटेड, तलोजा टायगर्स, खांदा कॉलनी सुपर किंग, खारघर वॉरियर्स, खारघर, फोनिक्स,कलंबोलीवॉरियर्स,कर्जत रायझिंग स्टार्स नेरूळ चॅम्पियन्स आणि करंजाडे वॉरियर्स अशा एकूण 12 डॉक्टरांच्या संघाने भाग घेतला होता. आणि महिलांच्या संघामध्ये कलंबोली उलवे,पनवेल डी डब्ल्यू ए पी,एन एच एफ नवी मुंबई,आणि पनवेल वॉरियर्स अशा एकूण पाच संघाने भाग घेतला होता.
पनवेल डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शिरीष जोशी, सचिव डॉ सचिन पवार, खजिनदार डॉ. उमेश अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन डॉ.अक्षदीप अग्रवाल , डॉ कुणाल माखीजा,आयबीएन लोकमतचे सहसंपादक विलास बडे, डॉ बाळासाहेब खडबडे. ओवळे गावचे सरपंच रुपेश गायकवाड आदींच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी डॉ अरुणकुमार भगत, डॉ रणजीत माळी डॉ संतोष जगे,डॉ संकेत पवळ, डॉ प्रसन्ना जैन डॉ अरुण शिंदे डॉ. अभिजीत भोईर. डॉक्टर प्रदीप विघ्ने, डॉ कंकण करावकर,डॉ वैभव बैलकर डॉ विकास गंडल,डॉ इंदर चव्हाण डॉ यासीन शेख, डॉ. नीलिमा बैलकर, डॉ स्वप्ना भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.